भन्ते उर्गेन संघरक्षित
भन्ते तुम्ही आमची प्रेरणा आहात शिलरूपी गंध आहात
प्रज्ञारूपी दृष्टी तुमची करुणेचा अथांग सागर आहात
अज्ञानरुपी वाळवंटात फुलवलेली बाग आहात
माणुसकीचा धम्म तुमचा विर्याची खान आहात
त्रिरत्नावर श्रद्धा तुमची त्याचे तुम्ही अभिवेक्ती आहात
शरणगमनाचे चैतन्य नवे त्या चैतन्याचे प्रखर तेज आहात
धम्म हीच संपत्ती तुमची त्याचे सुवर्ण पान आहात
बोधिसत्वाचे रूप तुमचे संघाचे आधारस्तंभ आहात
सत्याचा मार्ग तुमचा तुम्ही निर्वाणाचे धनी आहात
भन्ते आजही तुम्ही आमच्या हृदयात जिवंत आहात
भन्ते आजही तुम्ही आमच्या हृदयात जिवंत आहात