Saddhammapradip
Wed, 30 Sep, 2015 - 05:25
Wed, 30 Sep, 2015 - 05:25नुकतेच सधम्म प्रदीप रिट्रीट सेंटर भाजे गांव तालुका मावळ लोणावळा इथे तीन दिवसीय विशेष धम्म चिंतन कार्यशाळा यशस्वी रित्या पार पडली त्या मध्ये धम्म जीवन जगत असताना कौटुम्बिक संतुलन कैसे राखयाचे या विषयावर त्रिरत्न बौद्ध महासंघाचे भारतातील उपाध्याय आदरणीय धम्मचारी चंद्रशील यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले
तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जेष्ठ धम्मचारी अनंत मित्र, मंजूचित्त, अचलदीप, तेजोवज्र यांच्या समवेत धम्म मित्र सुधाकर इंगावले, आणि मुकुंद भास्कर यांचा समावेश होता. वरील विषयावर उपाध्याय धम्मचारी चंद्रशील यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीतून संतुलन कैसे साध्य करायचे, जुनी जीवन पद्धती आणि विद्यमान जीवन पद्धती मध्ये कोणता मूलभूत फरक आहे, आणि आपल्या स्व अनुभुवातून कुटुंबामध्ये संतुलन राखण्यासाठी तथागतांचा मूळ सिद्धांत कसा काम करतो ते शास्त्रीय पद्धतीने स्पष्ठ केले, तथागतांचे मूळ सिद्धांत प्रत्येक्षात कसे काम करतात ते अतिशय सखोलपने मांडून सिद्ध केले अनेक प्रकारचे प्रश्न विचारुन् अगदी सहज चर्चा घडवून आणली त्यामध्ये सर्वांनी अगदी मुक्त पणे चर्च्या केली त्यामध्ये जणू कही खजान्यामधील अनेक रत्न सापडत आहेत असेच वाटत होते त्याचीच साक्ष ठेवून वरील फोटोच्या जागेची निवड केली पाठी मागे छोटासा बोधि वृक्ष आहे त्याची जस जसी वाढ होईल तसी आम्ही आमच्या प्रामाणिक आचाराणाने आध्यात्मिक प्रगतित वाढ होईल …..नमो बुद्धाय जय भिम…..