Bhaja Cave

Art Retreat - Oct 19

On Mon, 14 October, 2019 - 07:27
Saddhammapradip's picture
Saddhammapradip

Art retreat led Dh Guhyacitta from 11th to 13th Oct 19. In this retreat try explore Art as Views, Experience And Consciousness. We also got chance to hear Golap poetry, which was uplifting experience. हलत्या प्रतिमेचा हलताच अर्थ होईल असे होत नाही…. यथार्थाताचा अर्थ शोधतांना, अर्थाचे कवच गळून पडले… परिधानतेचा परिप्रेक्ष शेषाकडून नामशेषाकडे वळून नम्र झाला…. डोळ्यांच्या आकारापेक्षा दृश्याचा व्यास मोठा असतांनाही, दृष्टीने दाखवलेल्या औदार्याचा मी ऋणी आहे…. एवढ्या मोठ्या चित्राशयाची ही कोणी केली बुबुळा एवढी परतीकृती? रंगांच्या कक्षा आकृतीबंधाची परिसीमा ओलांडून देहाच्या आंतस्थ लेणीच्या गडद गर्भगृहाकडे तोलावत असतांनाच, उजेडाच्या महाद्वारावर द्वारपालाने देहात अंधार घेऊन जाण्यावर घातली आहे बंदी…… क्षणाक्षणाला धारणा अनेक संशयांना गर्भाशयाच्या तळाशी भ्रमाच्या विस्ताराचे धडे देत आहे…हिर्याच्या बदलल्या खडे देत आहे… खरंच बुद्धत्व किती सहज ढकलून देत आहे, मोहाच्या तकलादू भिंतीला…. तृष्णेच्या महाकाय दरीतून अनंत जन्माचे अमोज सांगाडे फोडत आहेत मुक्तिचा एकसुरी टाहो… भास आभासाच्या युक्तिवादातुन बाहेर पडतोय वास्तवाचा मुखवटा, हरवलेल्या रंगाची तक्रार घेऊन…. काळोखाच्या रिंगणाबाहेर सजवली आहे रोषणाई… अवधान सावधानच्या अवस्थेत आहे एकाग्र, चित्ताच्या भ्रमंतीचे चित्र रेखाटण्यासाठी चिंतातूर….ध्यान ध्यानावर ठेवून आहे तटस्थ नजर, हालचालीचा सुक्ष्म निरीक्षक म्हणून… अंतरंगातुन उठलेली एक लहर, प्रक्षेपित होत आहे, संवेदनेच्या पठारावर.. जागृतीचा खडक तपासून घेतोय एकेका लहरींची आदिमता… आभास निर्णायक कसोटीवर घासून गुळगुळीत होतोय…. प्रवाहातील शेवाळलेल्या उतारा सारखा…..याही स्थितीत घसरत नाही बुद्धत्वाचा कण प्रेरणेने प्रभावित होऊन नम्र वाटत राहतो चिवट लव्हाळ्या सारखा…तृष्णेच्या वाहत्या प्रवाहाची स्मारके बघत…..निनादत राहतो नाद,नाद अनित्यत्वाचा ….. तेंव्हापासून ते आजवर एक कंठक घोडा उभा आहे, रोहिणीच्या नदीपात्रात उलट्या पात्राची आभा बघण्यासाठी….. मेधावीने उतरवलेल्या अंगावरील अलंकाराची पाठीवर पिशवी घेऊन……केशवेप्पनाच्या प्रतिक्षेत….सजग ध्यानाच्या समाधीवर एकटक डोळ्यांची उघडझाप करत….. दृष्टि अन् दृश्याचा व्यासव्याप्त प्रदेश न्हाळत……..ध्यानात सावधान राहणं कठीण असतं नाही का? हलत्या प्रतिमेचा हलताच अर्थ होईल असं होत नाही…. गोपाल गंगावणे (साभार…त्रिलोक्य)

Log in or register to take part in this conversation